Enquire Now

Request A Quote

जेजेच्या गजाली !

रापणीतून सुटलेले असंख्य व्हेज नॉनव्हेज किस्से धोंड मास्तरांच्या पोतडीत खच्चून भरलेले असणार याविषयी मनात शंका नव्हती. म्हणूनच "रापणीतून सुटलेले" अशा शीर्षकाचा लेख धोंड मास्तरांकडून लिहून घ्यायचाच असा निश्चय ''चिन्ह''च्या पहिल्या पर्वातच केला होता. पण अनेकवार प्रयत्न करून तो काही मला तडीला नेता आला नाही. कधी "चिन्ह"चं प्रकाशन थांबल्यामुळे तर कधी धोंड मास्तरांच्या आजारपणामुळे तर कधी अन्य काही कारणांमुळे ते जमून आले नाहीच. आणि धोंड मास्तर गेल्यानंतर तर सततच त्या गोष्टीची खंत वाटत राहिली. म्हणूनच "जे जे जगी जगले " या ग्रंथात "रापण"ला विशेष स्थान देण्याचा निर्णय मी घेतला.

एकतर मराठी साहित्यात असलेल्या जे जे वरच्या पुस्तकावरची वानवा हे तर कारण आहेच पण दुसरं महत्वाचं कारण म्हणजे या पुस्तकाला लाभलेलं दस्तऐवजीकरण असून देखील आत्मकथनाचं लाभलेलं प्रसन्न स्वरूप. कुठल्याही पानावरुन ते पुस्तक उघडा तुम्ही जेजेचे असाल वा नसाल तुम्ही त्यात अडकूनच पडता, गुंतून जाता आणि पुस्तक संपवूनच मग हातातून खाली ठेवता. याचं सारं श्रेय अर्थातच धोंड मास्तरांच्या गोष्टीवेल्हाळपणाचं आणि तितकंच ते त्यांना बोलतं करणाऱ्या संभाजी कदम सरांचं.

हे पुस्तक मराठी साहित्यातलं एक अजोड लेणं ठरलं आहे आणि म्हणूनच त्याच्याविषयी "चिन्ह " मध्ये काहीदेखील न येणं याचं शल्य मनाला सदैव डाचत होतं. मध्यंतरी धोंड मास्तरांचे जावई "राम कामत" यांच्याशी संपर्क साधला. त्यांना विनंती केली की, धोंड मास्तर, जेजेच्या संदर्भात ज्या बैठका रंगवत त्यातले "रापण " मध्ये न जाऊ शकलेले काही किस्से आठवतात का ? पण त्यांनाही काही आठवत नव्हतं. मग आता काय करायचं ? असा प्रश्न उभा राहिला. म्हणून मग वाचन हेच ज्यांचं जगणं आहे अशा ''शशिकांत सावंत'' यांना आम्ही ''रापण''वर लिहिण्याविषयी विनंती केली. त्यांनी ही ती मानली. त्यांचा हा लेख पुढली अनेक दशक ''रापण''चं महत्व अधोरेखित करीत राहील यात शंकाच नाही 


संपादक 


आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  


Top News

 

News 1

आणखीन एका विक्रमाच्या प्रतीक्षेत !

Read More

News 2

असा कलाशिक्षक होणे नाही !

Read More

News 3

ढग गडगडल्या सारखं हसणारे सर !

Read More

News 4

वादग्रस्त...

Read More

News 5

व्हरांड्यातली बुटांची टॉकटॉक...

Read More
12345678910...