Enquire Now

Request A Quote

चित्रकलेवरचं मराठीतलं पहिलं पुस्तक !

जेजेत प्रवेश केला आणि पहिल्यांदा थेट लायब्ररी गाठली. का ? तर जेजेविषयीचं काही पुस्तकं तिथे तरी वाचायला मिळेल म्हणून. पण लायब्ररीयन बाईनं चक्क नकार दिला. म्हणाल्या "नाही, असं काही पुस्तक आपल्याकडे नाही." एवढी मोठी वास्तू आणि त्या वास्तूचा इतका मोठा इतिहास. आणि यावर एकही पुस्तक नाही. कमाल आहे ! मी अक्षरशः किंचाळलोच. तेव्हा कुठे त्या बाई भानावर आल्या. म्हणाल्या "थांब थांब... एक पुस्तक बहुतेक आहे. धुरंधरांचं. पण इथंच वाचायचं माझ्यासमोरच्या खुर्चीवर बसायचं. चहा प्यायला गेलास तर माझ्या टेबलावर ते ठेवून जायचं." म्हटलं एवढ्या जाचक अटी का घालताय ? तर म्हणाल्या "या पुस्तकाची आपल्याकडे एकच प्रत आहे. आपल्याकडची मुलं अनेकदा फोटो किंवा चित्रं कापून नेतात. म्हणून या अटी घालाव्या लागतात."

अत्यंत जीर्ण-शीर्ण अशी ती प्रत होती. जरासा जरी वेडावाकडा हात लागला तरी पान टरकावलंच जायचं. वाचनाचे संस्कार घेऊनच मी जेजेत प्रवेश केला होता. त्यामुळे अत्यंत काळजी घेऊन मी ते पुस्तक हातावेगळं केलं. ते वाचून त्याही वयात थरारून गेलो होतो. मला त्या पुस्तकाची एकतरी प्रत हवी होती. पण नाहीच मिळाली. एकदा अंबूताईंकडे जायचा योग आला. बोलता बोलता पुस्तकाचा विषय काढला तर म्हणाल्या "माझ्याकडे एक प्रत होतीरे.. पण कोणी परत आणूनच दिली नाही." तो विषय काढण्यामागे माझा उद्देश असा होता की त्या पुस्तकाची आवृत्ती कुणीतरी काढावी यासाठी प्रयत्न करणे. पण त्यांच्याकडून प्रत न मिळाल्याने तो प्रयत्न तसाच राहिला. असो. तब्बल ७० वर्षानंतर का होईना ज्यानं माझ्या आधी ती प्रत नेली होती त्याचा प्रयत्न सफल झाला हे काय थोडं झालं ?

म्हणूनच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचं मनापासून अभिनंदन करावंस वाटतं. या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्व जाणूनच ''चिन्ह''नं ''जे जे जगी जगले...'' या ग्रंथात या पुस्तकावर शशिकांत सावंत  यांच्याकडून एक विशेष लेख लिहून घेतला आहे.


संपादक 


आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  




Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...