Enquire Now

Request A Quote

भारतीय चित्रकलेचा दिशादर्शक !

फार पूर्वी म्हणजे सत्तरच्या दशकात जेजेत प्रवेश केल्याकेल्या एक अप्रतिम पोर्ट्रेट हमखास लक्ष वेधून घ्यायचं. साहजिकच मनाला कुतूहल वाटून ते कुणी केलंय त्याकडे प्रथम लक्ष जायचं. ते पोर्ट्रेट केलेलं होतं जेजेच्याच भोसुले मास्तरांनी आणि मग इतकं अप्रतिम पोर्ट्रेट ज्या व्यक्तीचं केलंय ती व्यक्ती तरी कोण ? या विषयी मनात उत्सुकता दाटून यायची. त्यातून मग नाव समोर यायचं ते ''''कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन'''' यांचं. आता हे सॉलोमन साहेब तरी कोण या प्रश्नाचं उत्तर मिळावयास मात्र धोंडसरांचं ''''रापण'''' प्रसिद्ध व्हावं लागलं. 


कारण आताच्या सारखी गुगलची व्यवस्था तेव्हा नव्हती. पण ''''रापण''''ने मात्र सॉलोमन साहेबांची खूप माहिती दिली आणि ते व्यक्तिमत्व कायमचंच स्मरणात जाऊन बसलं. इतकं की जेजेचा उल्लेख झाल्यावर सॉलोमन साहेबांचं नाव निघालं नाही असं क्वचितच झालं. त्यातूनच अगदी अचानकच २००७ साली सॉलोमन साहेबांवरचा ''''चिंतामण गोखले'''' यांचा हा लेख हाती आला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. मूळ लेख वाचाल तेव्हा आपणही आमच्या मताशी सहमत व्हाल याची खात्री आहे आणि म्हणूनच तो ''''जेजे जगी...'''' मध्ये समाविष्ट करण्यात आला.


सतीश नाईक 

संपादक 


आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''''निवडक'''' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''''व्यक्तिचित्रं शब्दातली'''' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''''चिन्ह''''चा बहुचर्चित ''''गायतोंडे'''' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''''चित्रसूत्र'''' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  


Top News

 

News 1

आणखीन एका विक्रमाच्या प्रतीक्षेत !

Read More

News 2

असा कलाशिक्षक होणे नाही !

Read More

News 3

ढग गडगडल्या सारखं हसणारे सर !

Read More

News 4

वादग्रस्त...

Read More

News 5

व्हरांड्यातली बुटांची टॉकटॉक...

Read More
12345678910...