Enquire Now

Request A Quote

भारतीय कलाविश्वाचा जन्मदाता !

सर जमशेटजी जीजीभाई असं नाव गुगल केलं की आज अक्षरश: खंडीभर माहिती तुमच्यासमोर क्षणार्धात उभी राहते. ७० -८० च्या दशकात ही अशी सुविधा नव्हती. तुम्हाला हवी असलेली माहिती पुस्तकाद्वारे मिळवावी लागायची किंवा नियतकालिकात आलेल्या लेखांद्वारे. लायब्ररीत नाही मिळाली तर जुन्या पुस्तकांच्या दुकानातून किंवा फुटपाथवरच्या विक्रेत्यांकडून ती मिळवावी लागे. पण ही व्यवस्था अपुरी होती. तिथं हमखास काही मिळेलच याची खात्री नसायची.


साहजिकच जेजेत प्रवेश घेईपर्यन्त जेजेविषयी अधिक काही ठाऊक असण्याची शक्यताच नव्हती. मग जमशेटजींविषयी अधिक काही ठाऊक असण्याची तर अजिबातच शक्यता नव्हती. धोंडसरांचं "रापण" हे नंतर आलं. त्यामुळे साहजिकच जेजेच्या लायब्ररीकडे मोर्चा वळवला. विश्वकोशात एक दोन टिपणं वाचायला मिळाली, त्यामुळे बऱ्यापैकी माहिती मिळाली. पण लायब्ररीत आणखी माहिती शोधायला गेलो तर, लायब्ररीयन बाईंनी बजावले ''इकडेच बसायचं, काय करताय ते आमच्या डोळ्यासमोर करा, हल्लीची मुलं पुस्तकातली पानं कापून घेतात किंवा फाडतात वगैरे.'' हे सारं ऐकलं आणि लायब्ररीत बसून वाचायची माझी इच्छाच मेली.


आता काय करायचं. अशावेळी नेमकी गाठ पडली ती प्रा. विश्वास यंदे सरांची. त्यांनी स्वतः काही काळ जेजेतच लायब्ररीयन म्हणून काम केलेलं. त्यातच त्यांचं वाचन अफाट आणि प्रत्येक विद्यार्थ्यांशी आत्मीयतेनं बोलण्याची पद्धत. माझं अर्धं काम तिथंच झालं.

त्यांनी काय वाचायचं, काय नाही हे समजावून सांगितलं. अशाच एका बैठकीत मी त्यांना आत्यंतिक कुतूहलानं जमशेटजी यांच्याविषयी विचारलं. आणि मग त्यांनी जे माहितीचं भांडार उभं केलं त्याला खरोखरच तोड नव्हती. त्यातच जीजीभाई कुटुंबियांसमवेत त्यांचा संबंध आला होता हे त्यांच्या तोंडून ऐकल्यावर तर मी त्या वयात गारच पडलो होतो.


त्यानंतर दोन तीन वर्षांनं धोंड सरांचं "रापण" प्रसिद्ध झालं. त्यातून जे जे आणि तिच्या माजी विद्यार्थ्याविषयी बरीच माहिती मिळत गेली. पण त्याआधी माहितीचा स्रोत होता तो म्हणजे प्रा विश्वास यंदे, बस. तेव्हा कधीतरी ऐकलेले जमशेटजी भाईंचे किस्से नंतर कायमचेच स्मरणात राहिले. ''चिन्ह'' चं २००१ साली पुनरुज्जीवन करण्याचं निश्चित झाल्यावर, पाहिला निर्णय घेतला तो गायतोंडे यांच्यावर विशेष पुरवणी प्रसिद्ध करण्याचा आणि दुसरा जमशेटजी जीजीभाईंवर यंदे सरांकडून लेख लिहून घेण्याचा. तोच लेख आता आम्ही तब्बल १९ वर्षानंतर '' जे जे जगी...'' मध्ये घेतो आहे. जसाच्या तसा. मला खात्री आहे की १९ वर्षांपूर्वी सरांकडून तो लिहून हाती आल्यावर माटुंग्याहून मुलुंडला घरी येईपर्यँतच्या प्रवासातच मी तो जसा अगदी आधाशासारखा वाचला होता तसाच तुम्ही तो आताही वाचाल, वाचतच रहाल.

सतीश नाईक 

संपादक 


आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) 
ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  


Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...