Enquire Now

Request A Quote

चित्रकार मुख्यमंत्र्यांच्या राज्यात ...

जहांगीर आर्ट गॅलरीच्या दर्शनी भागात लावलेल्या शोकेसचे काल संध्याकाळी घेतलेले हे प्रकाशचित्र आहे. ह्या शोकेसमध्ये जहांगीर कलादालनात जी प्रदर्शनं भरतात त्यांची पोस्टर्स लावली जातात. जेणे करून कलारसिकांना कुठल्या गॅलरीत काय चालले आहे याची कल्पना यावी. सध्या जहांगीरच्या चारही कलादालनात महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन भरलं आहे. पण त्या प्रदर्शनाचा मागमूस देखील जहांगीरच्या परिसरात जाणवत नाही. उदाहरणार्थ हेच पहा. या प्रदर्शनाचं साधं पोस्टर देखील लावलं गेलेलं नाही. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत तरी नव्हतं. 

परवाच्या दिवशी माननीय राज्यपालांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन झालं होतं. ५०-५० हजार रकमेची बक्षीसं देखील वाटली गेली.  पण जहांगीर आर्ट गॅलरी मधल्या मानाच्या म्हणवल्या जाणाऱ्या या राज्य कला प्रदर्शनाची ही अशी दीनवाणी अवस्था होती. कला संचालनालयाची इमारत ज्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात आहे त्या परिसरातील जेजेमधल्या एखाद्या प्राध्यापक / शिक्षकाकडून एखादे पोस्टर करून घेता आले नसते का ? अगदीच भीक लागली होती तर एखाद्या विद्यार्थ्याकडून तरी दमदाटी करून पोस्टर करून घेऊन तेथे लावता आले नसते का ? पण तेवढेही कष्ट कला संचालनालयातल्या अधिकाऱ्यांना दाखवता येऊ नये याचे आश्चर्य वाटण्याचे दिवस कधीच निघून गेले आहेत.

 पण ज्या कला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाला आहे त्या कला महाविद्यालयाच्या किंवा कला संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना थोडीही लाज शरम वाटू नये याचे मात्र जरूर आश्चर्य वाटते. आणि या वरून महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी गेल्या तीन ते चार दशकात कला शिक्षणाच्या बाबतीत कोणे एके काळी संपूर्ण भारतात सर्वोच्च पदावर असलेल्या महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाची काय वाताहत करून टाकली आहे याची चांगलीच कल्पना येते. शीss 

Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...