Enquire Now

Request A Quote

जेजेतला न्यूड क्लास आणि पुतळ्यांच्या देशा !


बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली जेजे मध्ये ''''न्यूड क्लास'''' सुरु झाला. जेजे मधून शिकून जेजेमध्ये शिकवायचं भाग्य लाभलेले शिक्षक आता जेजेत फारसे राहिल्या नसल्यामुळं बाहेरून आलेल्या विशेषतः गावगन्ना उघडलेल्या फोकनाड विनाअनुदानित कलामहाविद्यालयातून जेजेत येऊन चिकटलेल्या शिक्षकांना याचं महत्व काय असणार? त्यामुळे कुणी काही या निमित्तानं कार्यक्रम करील किंवा विशेष उपक्रम राबविल किंवा हल्लीच्या भाषेत सांगायचं तर इव्हेंट वगैरे आयोजित करील अशी अपेक्षा करणंच मूर्खपणाचं ठरेल. 

खरं तर ''''न्यूड क्लास''''च्या शताब्दी वर्षानिमित्त एखादे भव्य न्यूड शिल्प वगैरे तयार करून ( अर्थातच दुसऱ्या कुणाकडून तयार करून घेऊन ) जेजेच्याच परिसरात लावायची आयडियाची कल्पना अजून कुणाच्या सुपीक डोक्यातून आली कशी नाही याचंच आश्यर्य वाटत. अद्यापही वेळ गेलेली नाही. अजून दीडशे कोटी देखील यायचेच आहेत. किमानपक्षी कल्पना लढवायला काय हरकत आहे. कुणी सांगावं गंमत म्हणून मांडलेली ही कल्पना फट म्हणता प्रत्यक्षात यायची सुद्धा. 

आम्ही मात्र आठ वर्षांपूर्वीच ''''न्यूड'''' अंक प्रसिद्ध करून मोकळे झालो. पण तेव्हा देखील आम्ही जाहीर केलं होत २०१९ साली ''''न्यूड क्लास''''ची शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत म्हणून. पण महाराष्ट्राचं सौंदर्य वाढवण्यात गुंतलेल्याना त्याच भान कुठलं असायला. वर्षादीड वर्षांपूर्वी तर जेजेचेच एक विद्यार्थी रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ''''न्यूड'''' हा चित्रपट देखील येऊन गेला. ''''नग्नता चित्रातली आणि मनातली'''' सारखा दोन सव्वादोनशे पानांचा अंक तयार करून प्रकाशित करणं किंवा ''''न्यूड'''' सारखा पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करणं या काही साध्यासुध्या गोष्टी नव्हेत. जरा जरी पाय घसरला असता तरी सारेच मुसळ केरात गेले असते. असो...  संपूर्ण महाराष्ट्र "पुतळ्यांच्या देशा"  करण्यात मग्न असलेल्यांना आणखीन काय आणि किती सांगायचं ? सगळंच प्रचंड मनस्ताप देणारं आहे.   

[ ''''न्यूड क्लास'''' शताब्दी वर्ष निमित्तानं ''''चिन्ह''''चा गाजलेल्या ''''नग्नता'''' अंकाच्या शिल्लक प्रती ( किंमत रु. ७५० + रु. ५० टपाल खर्च = रु. ८०० ) उपलब्ध करून देत आहोत. या अंकावर ''''चिन्ह''''चाच ''''गायतोंडे'''' ग्रंथ ( जनावृत्ती  ) भेट म्हणून मिळेल.  90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर नाव पत्यासह  Chinha 2 हा मेसेज पाठवून घरपोच मागवा. ]

Top News

 

News 1

चित्रकार मुख्यमंत्र्यांच्या राज्यात ...

Read More

News 2

पदमसी गेले...

Read More

News 3

गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार.....

Read More

News 4

बदलापुरात प्रदर्शन करायचे ?

Read More

News 5

श्यामकांत जाधव: शोकसभा !

Read More
12345678910...