Enquire Now

Request A Quote

नग्नता आणि गायतोंडे : एकावर एक फ्री


'''' नग्नता: चित्रातली आणि मनातली '''' हा केवळ मराठीतच नाही तर अन्य कुठल्याही भारतीय भाषांत पहिलाच ठरावा असा '''' न्यूड विशेषांक '''' आणि '''' गायतोंडे '''' हा चरित्रग्रंथ, ही दोन्ही '''' चिन्ह ''''ची अभिमानास्पद प्रकाशनं. ती प्रकाशित झाल्यावर माध्यमांचा आणि वाचकांचा देखील त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला. ''''नग्नता'''' अंकाच्या तर दोन 
 आवृत्या संपून गेल्या. लोकाग्रहास्त तिसरी मोठी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. जिच्या शिल्लक असलेल्या काही प्रती आम्ही अजूनही वितरीत करीत आहोत. ही आवृत्ती संपल्यावर मात्र छापील स्वरूपात ( हार्ड कॉपी ) काहीही प्रसिद्ध करायचे नाही असा निर्णय यापूर्वीच आम्ही घेतला आहे. 

तीच गोष्ट ''''गायतोंडे'''' ग्रंथाच्या बाबतीतली. याही ग्रंथाच्या आवृत्या ''''संग्राहक आवृत्ती'''' आणि ''''जनावृत्ती'''' अशा दोन्ही स्वरूपात आम्ही मोठ्या दिमाखात प्रसिद्ध केल्या. संग्राहक  आवृत्ती  खूपच महाग ( रु. ३००० ) असल्यामुळे सर्वसाधारण वाचकांना देखील विशेषतः विद्यार्थ्यांना वाचता यावी ( कारण या ग्रंथातील गायतोंडे यांचा सहवास लाभलेल्या जवळजवळ १९-२० व्यक्तींच्या लेखांमधून गायतोंडे यांचं जे चरित्र किंवा व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभं राहतं ते केवळ चित्रकारांनाच नव्हे तर लेखन, संगीत, अभिनय, नृत्य इत्यादी कलेच्या अभ्यासकांनाही, याहून देखील पुढं जाऊन सांगायचं झालं तर आयुष्यात '''' काहीतरी'''' करायची, ''''कोणीतरी'''' होण्याची आस बाळगण्याऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरू शकतं. )  म्हणूनच ''''गायतोंडे'''' ग्रंथाची आम्ही जनावृत्ती प्रसिद्ध केली. आणि तिची किंमतदेखील आम्ही माफक अशी फक्त ५०० रुपये ठेवली होती. 

''''गायतोंडे'''' यांच्या मुंबईतल्या चित्रप्रदर्शनाचं निमित्त साधून या दोन्ही प्रकाशनाच्या शिल्लक प्रती ३१ डिसेम्बर पर्यंत एका विशेष सवलत योजनेद्वारे आम्ही उपलब्ध करून देत आहोत. १२५० रुपये किंमतीच्या ही दोन्ही प्रकाशनं जवळजवळ नग्नता अंकाच्या किंमतीतच ( रु. ७५० + टपाल खर्च रु. ५० ) म्हणजेच जवळजवळ एकावर ( म्हणजे ''''नग्नता'''' अंकावर ) एक ( म्हणजे ''''गायतोंडे जनावृत्ती'''' ) मोफत अशाच प्रकारची ही योजना आहे. ज्या कोणाच्या संग्रही ही दोन्ही प्रकाशनं अद्यापही नसतील त्यांनी 90040 34903 या आमच्या व्हाट्सअप नंबरवर Chinha 2 या मेसेज सोबत स्वतःचा पत्ता पाठवून प्रती घरपोच मागून घ्याव्यात. कृपया लक्षात घ्या ही शेवटची संधी आहे. 

या प्रकाशनांची माहिती देणाऱ्या इमेजेस या पोस्टसोबत जोडल्याच आहे पण ज्यांना यापेक्षा अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी ''''गायतोंडे'''' आणि ''''नग्नता'''' या दोन्ही फेसबुक पेजेसच्या लिंक सोबत जोडल्या आहेत त्यावर क्लिक करा. 


a

Top News

 

News 1

आणखीन एका विक्रमाच्या प्रतीक्षेत !

Read More

News 2

असा कलाशिक्षक होणे नाही !

Read More

News 3

ढग गडगडल्या सारखं हसणारे सर !

Read More

News 4

वादग्रस्त...

Read More

News 5

व्हरांड्यातली बुटांची टॉकटॉक...

Read More
12345678910...