Enquire Now

Request A Quote

गायतोंडे आणि नग्नता : हे काय गौडबंगाल आहे?


''गायतोंडे'' यांच्यावरचं पहिलं पुस्तक प्रकाशित करण्याचा मान मराठी भाषेलाच मिळाला. ''चिन्ह''ला याचा अभिमान आहे. म्युझियममधे  गायतोंडे यांच्या चित्रांचं  प्रदर्शन सध्या सुरु आहे. २ ऑगस्ट रोजी सुरु झालेलं हे प्रदर्शन थेट २५ डिसेम्बरपर्यंत चालणार आहे. गायतोंडे यांच्यासंदर्भात महत्वाच्या ठरलेल्या दोन तारखा या प्रदर्शनाच्या कालावधीतच येतात. म्हणजे उदाहरणार्थ १० ऑगस्ट हा त्यांचा मृत्यूदिन होता. तर येणाऱ्या नोव्हेंबरच्या २ तारखेला त्यांचा जन्मदिवस येणार आहे.१० ऑगस्टला आयोजकांकडून काहीतरी कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली. आता निदान २ नोव्हेंबरला तरी तिथं काही आयोजन केलं जाईल का हे आता पाहायचं. 


पण या निमित्तानं  ''चिन्ह''नं मात्र ''गायतोंडे'' ग्रंथाची जनआवृत्ती जास्तीत जास्त कलारसिक किंवा सर्वसामान्य  वाचकांपर्यंत अथवा कलाविद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी यासाठी एक विशेष योजना आखली आहे. या योजनेद्वारे ''गायतोंडे'' ग्रंथाची जनआवृत्ती फक्त ४०० रुपयांत उपलब्ध होईल. तीही अर्थातच घरपोच. 

आणखी एका योजनेद्वारे ही जनआवृत्ती आणि ''चिन्ह''चा सर्वात गाजलेला ''न्यूड'' विशेषांक ''नग्नता चित्रातली आणि मनातली'' हा देखील एका विशेष पॅकेजद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. जनआवृत्तीची किंमत आहे रुपये ५०० तर नग्नता अंकाची किंमत आहे रुपये ७५०. दोन्हीचे मिळून शुल्क होते रुपये १२५०. पण ''चिन्ह''ने हा संच अवघ्या ८०० रुपयांत उपलब्ध करून दिला आहे. हा संच रजिस्टर पार्सल द्वारे पाठवला जातो. इतकंच नव्हे तर येत्या १ संप्टेंबर पासून फोर्ट मार्केट परिसरात देखील या प्रती किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या संबंधीची घोषणा लवकरच करीत आहोत. 

''चिन्ह''च्या ९००४० ३४९०३ या  व्हाट्सअप नंबरवर Chinha 2 हा मेसेज स्वतःच्या नाव पत्यासह पाठवल्यास लगेचच प्रत पाठवली जाते. रुपये ८०० हे सवलत शुल्क नेटबँकिंग, Paytm, Google Pay , आणि Bhim App द्वारे देखील भरता येते. 

बाय द वे, फेसबुकवर ही योजना जाहीर करताच पहिल्याच दिवशी सुमारे बारा जणांनी मागणी नोंदवली आहे. या बारा जणांमधले  नऊजणांचे पत्ते हे कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरातले आहे. हे काय गौडबंगाल आहे. न राहवून नितीन भोसले या ''चिन्ह''च्या कट्टर वाचकांना विचारले की, ''तुम्ही तर आधी ही दोन्ही प्रकाशनं घेतली आहेत मग आता पुन्हा का घेताय?'' तर ते म्हणाले, होय ! माझ्याकडे ती दोन्ही आहेत , पण या दोन्ही प्रती माझ्या अगदी जवळच्या मित्रांना भेट देण्यासाठी नोंदवल्या आहेत. ''चिन्ह''च्या आणखी एका वाचकांना हाच प्रश्न विचारला तुम्ही ''गायतोंडे'' ग्रंथाची प्रत घेतली आहे तरी जनआवृत्ती का घेताय तर त्यावर ते म्हणाले घरात येणाऱ्या जाणाऱ्याची धाड पडते ती नेमकी ''गायतोंडे'' डिलक्स प्रतीवर . बरं आम्ही पडलो कोल्हापूरकर एकदम दिलदार.. नाही कोणाला म्हणत नाही, पण प्रत कोणाला उसनी वाचायला दिली की ती येईपर्यत जीव थाऱ्यावर राहत नाही. म्हणून आयडिया काढली राव, की आता कोणी डिलक्स प्रत मागितली का  त्यांना जनआवृत्ती द्यायची. कशी आहे आयडिया. ब्येष्ट की नाही .. मी म्हटलं यकदम फर्स्ट क्लास ! 

''नग्नता''चं ही तेच झालंय. अनेकजण वारंवार प्रती मागवतात. असं का ? विचारलं तर सांगतात, अमक्या तमक्या मित्रानं / मैत्रिणीनं / शेजाऱ्यानं / स्नेह्यानं वाचून झाली की लगेच परत आणून देतो या बोलीवर प्रत वाचायला नेली. पण मग ती प्रत घरी परत आलीच नाही. तर काय घ्या ! म्हणून दुसरी कॉपी मागवायला  लागली. एक तर  कोल्हापूरकर असे बहाद्दर निघाले म्हणाले, मी ''नग्नता''च्या दोन कॉपी घेतल्यात एक माझ्या संग्रहात ठेवली आहे, तर दुसरी वाचायला देण्यासाठी जवळ बाळगली आहे. आता बोला ! 

Top News

 

News 1

गप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी !

Read More

News 2

नवं पुस्तक बिटवीन द लाईन्स !

Read More

News 3

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 4

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 5

चित्रकार होता होता ...

Read More
12345678910...