चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या दुर्मिळ चित्रांचं एक प्रदर्शनं येत्या ३ ऑगस्टपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातल्या जहांगीर निकोलसन गॅलरीत ( दुसरा मजला इस्ट विंग ) येथे सुरु होणार आहे. जहांगीर निकोलसन आर्ट फाउंडेशन या संस्थेनं द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या सौजन्यानं हे प्रदर्शन भरवलं आहे. " V. S. Gaitonde - The silent observor" हे शीर्षक असलेल्या प्रदर्शनात जहांगीर निकोलसन आर्ट फाउंडेशन आणि द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्या संग्रहातील गायतोंडे यांची अत्यंत दुर्मिळ चित्र या निमित्तानं बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर एकत्रितरित्या पाहावयास मिळणार आहे.
ही चित्रं जेव्हा प्रख्यात कला संग्राहक जहांगीर निकोलसन यांनी किंवा नामवंत शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी TIFR साठी विकत घेतली तेव्हा त्यांच्या किंमती काही एक हजारांच्या घरात होत्या. उदाहरणार्थ एक ते तीन हजार वगैरे.... ही गोष्ट झाली ६० च्या दशकाच्या उत्तरार्धाची किंवा ७० च्या दशकाच्या पूर्वार्धातली. आज आणि आता सुमारे ५०-५५ वर्षानंतर त्याच चित्रांची किंमत २०-३० कोटींमध्ये गणली जाते. असं काय आहे त्या चित्रांमध्ये ? हेच जाणून घेण्यासाठी या प्रदर्शनास भेट द्यावयास विसरू नका.
हे प्रदर्शन २५ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असून सकाळी १०. ५ ते सायं. ६.००. या प्रदर्शनाविषयीचे सर्वच अपडेट वरचेवर देणार आहोत ते वाचायला विसरू नका.