Enquire Now

Request A Quote

गायतोंडे ग्रंथाचे गुलजार यांच्या हस्ते प्रकाशन

भारतात अमूर्त चित्रकला क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री वासुदेव गायतोंडे यांच्या कलाकार्याचा गौरव करणारा ग्रंथ गायतोंडे च्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन येत्या 6 एप्रिलला दुपारी चार वाजता मुंबईतल्या राष्ट्रीय आधुनिक कला अकादमीच्या सभागृहात ज्येष्ठकवी, गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहितीललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ उत्तम पाचारणे यांनी दिली.

चिन्ह ने संपादित केलेल्या या मराठी ग्रंथाची हिंदी आवृत्ती ललित कला अकादमीने काढली आहे. मराठी भाषेतील या ग्रंथालाकला जगतातील जाणकार आणि सर्वसामान्य रसिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.त्यामुळे हाग्रंथ देशभरातील रसिकांपर्यत पोहचवण्यासाठी अकादमीने त्याचा हिंदी अनुवाद केलाआहे. एनजीएमए मध्ये होणाऱ्या ह्या प्रकाशन समारंभाला सुप्रसिद्ध हिंदी अनुवादक प्रकाश भातंब्रेकर आणि प्रतिष्ठा सिंह, ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे आणि चिन्हचे संपादक सतीश नाईक उपस्थित राहणार आहेत. एक मनस्वी, गूढचित्रकाराच्या कलेमागच्या प्रेरणा आणि विचाराचे रहस्य कवी गुलजार यांच्या हस्तेऐकणं रसिकांसाठी मेजवानी राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी चित्रपटकथा आणि पटकथा लेखिका मनीषा कोरडे करणार आहेत.

चित्रकार वासुदेव गायतोंडे जागतिक दर्जाचेअमूर्त कलाकार होते.त्यांची चित्रशैली,आयुष्य आणि कलेविषयीची त्यांची गूढ दृष्टी रसिकांपर्यत पोहचवण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ हिंदीत आणला आहे. ललित कलांना प्रोत्साहन देणे,उदयोन्मुख कलाकारांना त्यांच्या कला प्रदर्शित करण्याची संधी देणे, तसेचज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करणे ही ललित कला अकादमीची जबाबदारी आहे, अशी माहिती पाचारणे यांनी दिली.ह्याच विचारातून हा ग्रंथ प्रकाशित करतांना आपल्याला विशेषआनंद होत आहे, असं पाचारणे यांनी सांगितलं.

ललितकला अकादमीचे साठावे राष्ट्रीय प्रदर्शन सध्या मुंबईत सुरु आहे. ललित कलांना सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवणे आणि कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी दरवर्षी हे कलाप्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात देशभरातील कलाकारांच्या कलाकृती लावण्यात आल्या आहेत. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या 15 कलाकारांच्या कलाकृती देखील या प्रदर्शनात आहेत. 16 एप्रिल पर्यत हे प्रदर्शन रसिकांना बघता येणार आहे.

Top News

 

News 1

पुन्हा गायतोंडेच ...

Read More

News 2

आता भूपेन खक्करही कोट्यवधींच्या शर्यतीत

Read More

News 3

अवश्य वाचा

Read More

News 4

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

Read More

News 5

आणखी एक लिलाव !

Read More
123456789