Enquire Now

Request A Quote

यंदाचा मान्सून शो

राम चॅटर्जी यांनी जहांगीर आर्ट गॅलरीचं  सचिवपद भूषवताना आपल्या कारकिर्दीत असंख्य कला विषयक उपक्रम राबवले. उदाहरणार्थ  विविध कलावंताचे सत्कार समारंभ, शोक सभा, ललित कला दिल्लीच्या कार्यक्रमाचं आयोजन तसेच विशेष ड्रॉईंग शो, ग्राफिक्स शो, पेंटिंग शो , मान्सून शो वगैरे. यातील मान्सून शो वगळता अन्य सर्वच प्रदर्शनाचं त्यांनी सुंदर कॅटलॉग प्रसिद्ध करून दस्तावेजीकरण देखील केलं होतं. ते गेल्यानंतर मात्र पुढं सर्वच उपक्रम हळूहळू बंद पडले. कारण अशा  स्वरूपाच्या संकल्पना उभ्या करायला जी जिद्द किंवा दृष्टी लागते ती नंतरच्या जहांगीरशी संबंधित असलेल्यांकडे नव्हती. फक्त आता मान्सून शो तेवढा उपचारापुरता उरला आहे. 

यंदाचा मान्सून शो २१ जून पासून सुरू झाला असून तो २८ जूनपर्यंत चालणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात जेजे स्कूल ऑफ आर्टच्या शुभम मालू, श्रद्धा मोरे, दिशा आनंदाचे, नाहुष पाटील, राजेश्वरी वांकित, सूचित जोशी, मनाली कुलकर्णी, अंजु कोलंगारा, देवेंद्र बार्डे, राहुल जीवने, राहुल कराळे, सिद्धेश जाधव, अजय माळी, अंजु शर्मा, राहुल पवार, स्मृती कृपाल, राहुल तारी, प्रतीक जाधव, यश चौलकर, श्वेता पाटणकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

अन्य कला महाविद्यालयाच्या निवड झालेल्यांची नावं पुढील प्रमाणे. 

रचना संसद अकॅडमी ऑफ फाइन आर्टस् ऍण्ड क्राफ्ट्स : ऐश्वर्या परब, अंजली नायर, रितूंशा गर्ग

शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर : करण कवाडे,  सोनाली चौधरी, मयूर भुसारी, विनोद कोवे, पौर्णिमा महिंद्रकर 

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ  फाइन आर्ट ,पुणे : अमित तारडे, ऐश्वर्या कुलकर्णी, सोनिया चोपडा, अभिजित भोसले. 

भारती कला महाविद्यालय , पुणे : अक्षता मावळकर , चैत्राली भिसे. 

ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय , नवरगाव : वामदेव निकुरे, सुरभी कागडेलवर, चेतन वाढाई , अश्विनी गोवले, अबोली लांबे.   

कला विद्या संकुल, पॉलीटेकनिक मुंबई : अभिषेक यादव, तेजश्री पवार 

जेके अकँडमी ऑफ आर्ट, मुंबई : मनोज काजबळे, सिद्धेश शिंदे, गजानन पालेकर, अनुप धुरिया, गणेश आणेराव. 

सह्यांद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे : किरण खापरे, कॊस्तुभ सुतार, सोनाली तटकरे, श्रुती सोमण, कोलते, अनिकेत बाइत, संकेत सुतार, समीर घडाशी, सौरभ महाजन, केतन मेस्त्री

साई चित्रकला महाविद्यालय पुणे : आकाश कांबळे, विद्या केळकर, प्रफुल जैन, अजिंक्य पिसाळ, नाथोबा पांडे. 

वसई विकासिनी कॉलेज , वसई : रश्मीता गोम्स, विपुल चाळके, प्रियांका चिंदरकर, परेश जेठवा, निमिष गुरव. 

कलाविश्व महाविद्यालय सांगली : हर्षवर्धन देवतळे, अभिजित साळुंखे, पल्लवी चौगुले, अभिजित पाटील

अभिनव कला महाविद्यालय पुणे : रोहित यादव, सुशील जगताप. 

एस. एन. डी  टी कॉलेज ऑफ आर्ट मुंबई: सोनी पटेल, सुदेष्णा घोष, गायत्री मुरुडकर, पूजा पळसमकर, योगिता कोकारे 
 

Top News

 

News 1

यंदाचा मान्सून शो

Read More

News 2

चित्रकला वर्तुळात खळबळ !!!

Read More

News 3

पुन्हा गायतोंडेच ...

Read More

News 4

अवश्य वाचा

Read More

News 5

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

Read More
123456789