Enquire Now

Request A Quote

चित्रकला वर्तुळात खळबळ !!!

चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या नावे कलाक्षेत्रातील नामवंतांना जीवन गौरव पुरस्कार देण्याच्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेने चित्रकला वर्तुळात आनंदाची लाट पसरली आहे  शंकाच नाही . कलावंतांनी किंवा कलाक्षेत्राने कुठलीही  मागणी केली नसताना सरकारने पुढाकार घेऊन चित्रकला क्षेत्रासाठी काहीतरी  सढळ हातानं जाहीर करावं असं गेल्या पाच सहा दशकात पाहिल्यांदाच  घडलं असावं . आधीच्या सरकारात दृश्य कलावंतांनी काही मागितलं आणि यांनी सरळपणानं दिलं असं फार क्वचितच घडलं असावं. यशवंतरावांची आणि किंचित प्रमाणात वसंतराव आणि शरदराव यांची  कारकीर्द यास अपवाद ठरावी . बाकी बहुत्येकानी अनभिज्ञतेमुळं या क्षेत्रावर  सातत्यानं अन्यायच केला. 

विलासराव यांच्या सारख्यानी  तर काही द्यावायचं सोडा कलावंतांना जे मिळालं होतं ते देखील ओरबाडून घेण्यास मागं  पुढं पाहिलं नाही आणि महाराष्ट्रातील कलावंतांना इतर राज्यात जाऊन भीक मागायची वेळ आणली. त्यांचं ललित कला अकादमीच्या प्रादेशिक केंद्राचं प्रकरण अद्याप चित्रकार मंडळी विसरलेली नाहीत . त्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवर यांची गायतोंडे जीवन गौरव पुरस्काराची घोषणा आणि जेजे स्कूल ऑफ आर्टच्या तिन्ही महाविद्यालयांना १५० कोटी देण्याची घोषणा या  बातम्यांनी चित्रकला वर्तुळात खळबळ माजली नसती तर नवलच ठरलं असतं यात शंकाच नाही. आता संबंधित मंडळी वाट पाहतायत ती या साऱ्या घोषणा सरकार प्रत्यक्षात कशा पद्धतीनं आणणार याची . कारण ते करण्यासाठी कलासंचालनालयात  लायक माणसं तरी शिल्लक  कुठं  राहिली आहेत . !!!  

Top News

 

News 1

यंदाचा मान्सून शो

Read More

News 2

चित्रकला वर्तुळात खळबळ !!!

Read More

News 3

पुन्हा गायतोंडेच ...

Read More

News 4

अवश्य वाचा

Read More

News 5

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

Read More
123456789