Enquire Now

Request A Quote

पुन्हा गायतोंडेच ...

सॅफ्रनआर्टच्या समर ऑन लाईन लिलावात पुन्हा एकदा गायतोंडे यांचं तैलरंग चित्र विक्रमी किंमतीला गेलं आहे .उर्मिला आणि गुणवंत मंगलदास यांच्या संग्रहात असलेलं हे सुमारे ३०x २५ इंच आकाराचं चित्रं ९ ५२ २० ००० इतक्या विक्रमी किंमतीला विकलं गेलं आहे. या  छोट्या चित्राला सुमारे चार ते सहा करोड इतकी किंमत सॅफ्रनने जाहीर केली होती. पण मंदीच्या काळात देखील त्या चित्राला दुपटीपेक्षा जास्त बोली लावली जावी ही कला वर्तुळासाठी  निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. याच लिलावात गायतोंडे यांचं १९५३ सालातलं एक जलरंग आणि पेस्टल वापरलेलं चित्रं देखील असंच दुपटीपेक्षा जास्त बोली लागून विकलं गेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासूंना ती सॅफ्रनच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. 

Top News

 

News 1

यंदाचा मान्सून शो

Read More

News 2

चित्रकला वर्तुळात खळबळ !!!

Read More

News 3

पुन्हा गायतोंडेच ...

Read More

News 4

अवश्य वाचा

Read More

News 5

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

Read More
123456789