Enquire Now

Request A Quote

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

ललित कला अकादमी नवी दिल्ली तर्फे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक कला प्रदर्शनाचं आयोजन केल्या जात. असेच एक प्रदर्शन उद्या १२ जून रोजी पोलंड मधील युजिनीयस गेप्पर्ट अकादमी ऑफ फाईन आर्टच्या बेतोनोवी गॅलरीत भरावले जात आहे. ''''स्त्री  दृष्टी''''  या शीर्षकाच्या सदर प्रदर्शनात भारतातील ५१ मुद्रा चित्रकार स्त्री कलावंताच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.  अनुपम सूद, दुर्गा कॅनथोला, अनु गुप्ता , अवनी बंसल, डिम्पल शहा, गौरी वेमुला, कांचन चंदर, सीमा कोहली, रिमी धुमाळ यांचा  समावेश निवडलेल्या कलावंतांमध्ये आहे.  जिनचूक शिंदे, ज्योती देवघरे, तनुजा राणे, सीमा गोंडाणे, सुचिता घाडगे, किन्नरी तोंडळेकर , तेजस्विनी सोनावणे, मेधा सपकाळकर, विशाखा आपटे यासारख्या महाराष्ट्रातील अनेक महिला मुद्रा चित्रकारांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. या प्रदर्शनासाठी पोलंड सरकारच्या निमंत्रणावरून ललित कलाचे  अध्यक्ष श्री उत्तम पाचारणे हे पोलंडला रवाना झाले आहे. 

Top News

 

News 1

पुन्हा गायतोंडेच ...

Read More

News 2

आता भूपेन खक्करही कोट्यवधींच्या शर्यतीत

Read More

News 3

अवश्य वाचा

Read More

News 4

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

Read More

News 5

आणखी एक लिलाव !

Read More
123456789