Enquire Now

Request A Quote

पाचारणे यांची साफसफाई मोहीम !

उत्तम पाचारणे यांनी ललित कला अकादमीची साफसफाई करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरु केलं असल्याच्या बातम्या दिल्लीतून येऊ लागल्या आहेत . गेल्या अनेक वर्षांत सरकारनं या अकादमीकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळे  दिल्लीतल्या एका चित्रकार ( ? ) कंपूनं अकादमी हातात घेऊन अकादमीची जेव्हडी म्हणून वाताहत करता येईल तेव्हडी केली होती . त्यांना अकादमीच्या काही कर्मचाऱ्याकडून चांगली साथ लाभली.पाचारणे यांनी या साऱ्याचा गेल्या वर्षभरात चांगलाच अंदाज घेतला आणि आता त्यांनी शिल्पकलेच्या भाषेत  '''' मोल्ड '''' टाकायला घेतलेत . सापडला एकदा एखादा ( आणि तो सापडतोच ) का त्याची एकतर बदली तरी करायची किंवा त्याला निलंबित तरी करायचा असा खाक्या ठेवल्यामुळे भले भले दिल्लीकर चित्रकार आणि कर्मचारी  ठिकाणावर येऊ लागल्याच्या बातम्या आहेत . 

Top News

 

News 1

व्हेनिस बिएनालेतले मुंबईकर ...

Read More

News 2

या आठवड्यात

Read More

News 3

१३ दिवसात सव्वा लाख हिट्स !

Read More

News 4

पाचारणे यांची साफसफाई मोहीम !

Read More

News 5

ललित कला शिष्यवृत्ती 19 - 20

Read More
12345678