Enquire Now

Request A Quote

जेजेमध्ये कला मेळ्याची धमाल...

२५ मार्चपासून जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात दिल्लीच्या ललित कला अकादमीने "कला मेळा" चं आयोजन केलं आहे. दरवर्षी राष्ट्रीय प्रदर्शन पाहावयास येणाऱ्या कलावंताना प्रदर्शन पाहता यावे आणि त्या बरोबरच आपली कला देखील प्रदर्शित करता यावी या हेतूने हा उपक्रम दिल्लीत राबवला जातो. यंदा अकादमीचे चेअरमन उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय प्रदर्शन मुंबईत आल्यामुळे त्यासोबत कला मेळा देखील मुंबईत आला आहे. या कला मेळ्यासाठी जे जेच्या परिसरात जवळ जवळ दीडशे लहानमोठी कलादालनं उभारली आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील कलावंतांनी या कला दालनांमधून आपली कला प्रदर्शित केली आहे. चित्रांखेरीज सिरॅमिक , मेटल क्राफ्ट, हस्तकला वस्तू , शिल्प तसेच कलाविषयक प्रकाशन संस्था आणि रंग साहित्य बनवणाऱ्या कंपन्या देखील या कला मेळ्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. मुंबईत सहसा न मिळणारी ललित कला अकादमीची प्रकाशनं देखील अकादमीच्या स्टोल्सवर उपलब्ध आहेत . ३१ मार्च पर्यन्त रोज १२ ते ७ पर्यन्त चालणाऱ्या या कला मेळ्यात रोज सायंकाळी नृत्य , नाट्य , संगीत , कवी संमेलन असे विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत . मुंबई महाराष्ट्रातल्या कलावंतांनी , कलारसिकांनी आवर्जून भेट द्यायला हवा असाच हा ललित कला अकादमीचा उपक्रम आहे यात शंकाच नाही .

Top News

 

News 1

चित्रकार वसंत वानखेडे फाउंडेशनची स्थापना

Read More

News 2

नेहरू सेंटरमध्ये दोन तरुण चित्रकार

Read More

News 3

आज १८ एप्रिल, जागतिक वारसा दिन त्या निमित्ताने...

Read More

News 4

मंदीची कोंडी फुटली का ?

Read More

News 5

पं. शरद साठे यांच्या मुलाखतीचा लपंडाव !

Read More
1234