Enquire Now

Request A Quote

हिंदी "गायतोंडे" गुढी पाडव्याला प्रसिद्ध होणार

चिन्हने प्रसिद्ध केलेला गायतोंडे ग्रंथ आता हिंदीत देखील प्रसिद्ध होणार आहे. ललित कला अकादमी, दिल्ली तर्फे मुंबईत चालू असलेल्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या समारोपाच्या सुमारास म्हणजेच ६ एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे.अकादमीच्या अध्यक्षपदी शिल्पकार उत्तम पाचारणे यांची निवड झाल्यापासून मुंबई महाराष्ट्रातल्या कलावंताना झुकते माप मिळू लागले आहे, त्याचंच हे प्रमुख उदाहरण आहे. १९८३ साली गायतोंडे यांच्यावरचा पहिला मोनोग्राम ललित कला अकादमीने प्रसिद्ध केला होता त्यानंतर आता त्यांच्यावरचा हिंदी ग्रंथ देखील प्रकाशित करण्याची संधी या उत्तम पाचारणे यांच्या निर्णयाने अकादमीने निश्चिंतपणानं साधली आहे असं म्हणता येईल. हिंदी ग्रंथ २२४ पानांचा असून तो संपूर्णपणे रंगीत स्वरूपात छापला गेला आहे. मूळ मराठी ग्रंथापेक्षा हिंदी आवृत्तीत गायतोंडे यांची सुमारे २५ - ३० नवीन पेंटिग्ज समाविष्ट करण्यात आली आहे. मुंबईच्या सांस्कृतिक विश्वात ज्यांना मोठं स्थान आहे अशा कलावंतांकडून या ग्रंथाचं प्रकाशन केलं जाणार असल्याचं कळते.

Top News

 

News 1

चित्रकार वसंत वानखेडे फाउंडेशनची स्थापना

Read More

News 2

नेहरू सेंटरमध्ये दोन तरुण चित्रकार

Read More

News 3

आज १८ एप्रिल, जागतिक वारसा दिन त्या निमित्ताने...

Read More

News 4

मंदीची कोंडी फुटली का ?

Read More

News 5

पं. शरद साठे यांच्या मुलाखतीचा लपंडाव !

Read More
1234